जागतीक स्त्री दिन

       

      "स्त्री" ही अनेक रुपाने, अनेक गुणाने, अनेक भुमिकेत वावरताना आपण पहातो. बहीण, पत्नी व आई ही तिची आपल्याला माहीत असलेली रुपे आहेत. पण "आई" हे परमेश्वराने आपणा सर्वांसाठी निर्मिलेले सुंदर रुप आहे. ती अनंत जन्माची माता आहे, आणि हेच तीचे सर्वश्रेष्ठ रुप आहे. जगात सर्व काही पुन्हा पुन्हा प्राप्त होते, फक्त एकदाच प्राप्त होते ते मातृरुप. परमेश्वराने त्यात त्याच सर्वस्व प्राणपणाने ओतलय." कुपुत्रो सदा भवती कुमाता न भवती".  सर्वांत आधी ती एक स्त्री आहे, आणी तिच्या स्रीत्वाचा आदर करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.
   
  
         एकीकडे आज स्त्री, समाजात सर्व स्तरांवर प्रगतीचे सोपान चढत आहे. नवनव्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हिरीरीने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, आपल्या देशाचा भार उचलत आहे. एक सक्षम आधार बनत आहे तर दुसरीकडे त्याच स्रीला अत्याचार सहन करावा लागतोय, विकृत लांडग्यांच्या वासनेला ती बळी पडतेय, तिच्याकडे फक्त भोगवस्तू म्हणून पाहील जातयं. किती विरोधाभास आहे नाही का.? कुठेतरी हे थांबायलाच हव व याच पहिलं पाऊल मला माझ्यापासूनच उचलल गेल पाहीजे. माझी मानसिकता मला बदललावयास हवी. मुलगी जन्माला आली तर आता खेद बाळगण्याऐवजी आनंदोत्सव साजरा होईल. तिला लहानपणापासूनच सक्षम बनविण्यासाठी मी एक बाप म्हणून प्रयास करेन, एक आई म्हणून प्रयास करेन. कोणत्याही पुरुषाइतकी ती निर्भय व समर्थ असेल, इतका तिचा शारीरीक मानसीक व अध्यात्मिक विकास होण्यासाठी मी तिला प्रशिक्षण देईन व हे माझे, प्रत्येक बापाचे, आईचे कर्तव्य असेल. यामुळे ती फक्त स्वत:चच आत्मसंरक्षण नाही तर कुटुंबाच, समाजाच व वेळ पडल्यास देशाचही रक्षण करु शकेल. शारिरीक व मानसीक सामर्थ्य तिला प्रतीकूल परीस्थीतीशी निर्भयपणे सामना करण्याच बळ देईल तर अध्यात्मिक सामर्थ्यामुळे ती सुसंस्कृत, सात्विक व सकारात्मक विचारांची सुदृढ पिढी निर्माण करु शकेल.

           "भक्तीशिवाय शक्ती नाही." इतिहास साक्षी आहे. ज्या ज्या वेळी आपल्यावर संकटे आलीत, त्यावेळी हीच स्त्री शक्तिरुपात माझ्यासाठी धावून आली आहे. कधी बहीण, कधी पत्नी तर कधी माता दुर्गेच्या रुपात. दुर्गतीचा नाश माता दुर्गाच करते. मातलेल्या महिषासुराचा वध मायचंडिकेने, माता दुर्गेनेच केला आहे व करणार आहे. श्रीरामाला रावणवधात सहाय्य करण्यासाठी हीच रामवरदायीनी स्वरुपात धावून आली व मानवांपासुन अभयत्व प्राप्त झालेल्या काकासुर दैत्याचा आपल्या तेजस्वी परशूने वध करुन श्रीरामाच्या विजयाला सहाय्यीभूत झाली होती. तिच्या तिन्ही रुपांत तिने सर्व जगाच कल्याणच केलय. तेज स्वरुपिणी, ज्ञान स्वरुपिणी गायत्रीमाता, वात्सल्यरुपिणी अनसुयामाता व अशुभनाशिनी महिषासुरमर्दिनी माता. तिन्ही स्वरुपात व सदैव ती आईच आहे, माझी मोठी आई, जगद्जननी आई जगदंबा. "जय जगदंब जय दुर्गे"
   
       अशा सर्वश्रेष्ठ स्रीरुपाचा मला सदैव आदर केला पाहीजे व एक सक्षम व समर्थ स्त्री निर्माण होण्यासाठी पहिला प्रयास मला स्वत:च्या घरातून केला पाहीजे. तिला इतकं सक्षम बनविल पाहीजे की कुणी तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याची हिंमत करणार नाही व केलीच तर ती इतकी समर्थ असेल की समोरच्याची दुर्दशा होईल. तो इतरांसाठी धडा व स्रीजातीसाठी अभिमानास्पद क्षण असेल. तिच आत्मबल वाढलं तर कुटुंब, समाज व देशही बलशाली होईल.

          हे स्वप्न नाही तर ही कृती असावी. व त्यासाठी मलाच अविरत प्रयास करावयाचा आहे व तो मी करणारच अशी शपथ ह्या जागतीक स्त्री दिनानिमीत्त घेऊन त्याना आत्मसन्माची भेट देऊया. काय मग तयार आहात ना? घाबरु नका ती माय चंडीका, माता दुर्गा आपल्या पाठीशी आहे कारण तीही एक स्त्री आहे. हे स्त्री रुपा जागतीक स्त्री दिनी तुझ्या बहीण, पत्नी व मातृरुपाला त्रिवार वंदन.

- संजय वायंगणकर

4 comments:

  1. खूप छान लेख आहे. खरच खूप अंबज्ञ

    ReplyDelete
  2. संजय खूप सुंदर रीत्या स्त्रीच्या सामर्थ्याविषयी आपण विचार मांडले आहेत.
    तेज स्वरुपिणी, ज्ञान स्वरुपिणी गायत्रीमाता, वात्सल्यरुपिणी अनसुयामाता व अशुभनाशिनी महिषासुरमर्दिनी माता अशा माता दुर्गेने धारण केलेल्या विवीध रूपांनी नटलेल्या सर्वश्रेष्ठ स्रीरुपाचा मला सदैव आदर केला पाहीजे हा आपला अभिप्राय खरोखरी पटला. त्याकरिता उचलायचे पहिले पाऊल हे मलाच माझ्या घरातून उचलायचे आहे हे तुमचे मतही प्रत्येक माता-पित्याला विचार करण्यास भाग पाडेल. आदर्श माता दुर्गेचा मानून मला माझे आचरणही तसेच करायला हवे हा तुमचा संदेश अत्यंत स्पृहणीय आहे.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete